जळगाव जिल्ह्यातील चार पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

शंकर शेळके मुक्ताईनगरचे तर संतोष भंडारे जळगाव जिल्हापेठचे नूतन पोलिस निरीक्षक


Transfer of four police Inspectors from Jalgaon District भुसावळ : जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी प्रशासकीय कारणास्तव जळगाव जिल्ह्यातील चार पोलिस निरीक्षकांच्या बदल्या (Transfer of Four Police Inspectors) केल्या असून त्याबाबत सोमवार, 28 रोजी आदेश काढले आहेत. त्यात दोन बदल्या विनंतीवरून तर दोन बदल्या प्रशासकीय कारणावरून करण्यात आल्या आहेत.

वर्ग शिक्षिकेच्या बदलीनंतर ढसा-ढसा रडले विद्यार्थी : गोंडगावातील विद्यार्थ्यांचे प्रेम पाहून शिक्षिकाही गहिवरल्या

या निरीक्षकांच्या बदल्या
पारोळा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष नारायण भंडारे यांची जळगाव जिल्हापेठ पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे तर जळगाव जिल्हापेठचे पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांची पारोळा पोलिस निरीक्षकपदी बदली करण्यात आली. जळगाव नियंत्रण कक्षातील राहुल सोमनाथ खताळ यांची धरणगाव पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे तर धरणगावचे शंकर विठ्ठल शेळके यांची मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.



बर्‍हाणपूरच्या महिलेचा नायगावात खून : आरोपी पोलिसांच्या जाळ्यात 

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !