भुसावळातील सेल्समनची आमोदा शिवारातील शेत विहिरीत आत्महत्या
Bhusawal Salesman Suside यावल : भुसावळ शहरातील रेशन दुकानावर सेल्समन म्हणून काम करणार्या एका 56 वर्षीय इसमाने आमोदा शेत शिवारातील शेत विहिरीत उडी घेऊन आत्महत्या (Suside) केली. ही घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. अशोक वामन भंगाळे (लक्ष्मीनारायण नगर, भुसावळ, मूळ रहिवासी आमोदा, ता.यावल) असे मयताचे नाव आहे.
नोकरीच्या बहाण्याने लोकायुक्त इन्स्पेक्टरने केला तरुणावरच अनैसर्गिक अत्याचार
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
अशोक भंगाळे (ashok bhangale) हे रेशनदुकानावर सेल्समन म्हणून कामाला होते. सोमवारी ते दुचाकी घेऊन आमोदा येथे जाण्याकरीता घरून निघाले होते. सायंकाळ झाली मात्र ते घरी आले नाही म्हणून त्यांच्या कुटुंबाकडून त्यांच्या मोबाईलवर कॉल करण्यात आला मात्र कॉल एका वेगळ्याच इसमाने उचलला व त्यानंतर भंगाळे यांच्या आत्महत्येचा उलगडा झाला. फैजपूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर, पोलिस उपनिरीक्षक मोहन लोखंडे, सहायक फौजदार हेमंत सांगळे, अरुण नमायते, महेश वंजारी आदींनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरा शवविच्छेदनानंतर मृतावर आमोदा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. फैजपूर पोलिसात भरत भंगाळे यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची (ad) नोंद करण्यात आली. मयत भंगाळे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परीवार आहे.




