पाचोर्यात नवविवाहितेने गुंगीचे औषध देत पतीसह सासु-सासर्यांना केली बेदम मारहाण
पाचोरा : वडीलांसोबत माहेरी जाण्यास देण्यास नकार देणार्या सासू, सासरे व पतीला गुंगीकारक औषध देवून नवविवाहितेसह तिच्या वडिलांनी लोखंडी गजाने मारहाण करून गंभीर दुखापत केली. या प्रकरणी विवाहिता आणि तिच्या वडीलांवर पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, विवाहितेच्या पित्याला पाचोरा पोलिसांनी अटक केली आहे.
माहेरी जावू न दिल्याचा राग अनावर
अर्जून उखा पाटील (52, कोंडवाडा गल्ली, पाचोरा) हे पत्नी विजयाबाई, मुलगा राहूल आणि सुन पल्लवी पाटील असे वास्तव्याला आहे. राहूलचे सासरे साहेबराव साडू म्हस्के (रा.साबेलवाडी बदनापूर, पो.खामगाव, जिल्हा जालना) हे मुलीला भेटण्यासाठी आले. त्यावेळी पल्लवी हिने माहेरी जाते असे सांगितले. याला अर्जुन पाटील, पती राहुल आणि सासू विजयाबाई यांनी नकार दिला. याचा राग मनात ठेवून विवाहिता पल्लवी आणि तिचे वडील साहेबराव म्हस्के यांनी पिण्याच्या पाण्यात गुंगीकारक औषध तिघांना न कळत पाजले. या गुंगीच्या औषधाने झोप लागली. याचा फायदा घेत पल्लवी व तिच्या वडीलानी लोखंडी गजाने तिघांना बेदम मारहाण करून गंभीर जखमी करून जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवार, 27 मार्च रोजी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास घडली.


भुसावळातील सेल्समनची आमोदा शिवारातील शेत विहिरीत आत्महत्या
सुनेसह व्याह्याविरोधात तक्रार
याप्रकरणी अर्जून पाटील यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेवून सुन व व्याही यांच्या विरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून विवाहिता पल्लवी उर्फ कडूबाई राहूल पाटील (रा.पाचोरा) आणि साहेबराव साडू म्हस्के (रा. खामगाव, जि.जालना) यांच्या विरोधात पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल मोरे करीत आहे.
पाचोर्यात नवविवाहितेने गुंगीचे औषध देत पतीसह सासु-सासर्यांना केली बेदम मारहाण
रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता
पाचोर्यातील राहुल पाटील या तरुणाचे नुकतेच लग्न झाले असून संशयीत आरोपी असलेल्या नववधूने आपल्या वडिलांसोबत पळण्याचा प्लॅन केला मात्र त्याचवेळी सासर्यास जाग आल्याने प्लॅन फसला व दोघांनी मिळून कुटुंबियांवर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. नववधूचे यापूर्वीही लग्न झाले असल्याचे संशय असून त्यादृष्टीने पोलिसांनी तपासाला वेग दिला असून या माध्यमातून मोठे रॅकेट उघडकीस येईल, अशी शक्यता पोलिस निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांनी व्यक्त केली.
अवघ्या तीन वर्षांपूर्वी लग्न झालेल्या दाम्पत्याचे मृतदेहच आढळले


