धक्कादायक : धडापासून शीर वेगळे करीत पूजार्याची निर्घृण हत्या
नवी दिल्ली : 90 वर्षीय मंदिराच्या पुजार्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मारेकर्यांनी पुजार्याचं शीर धडापासून वेगळं केलं आणि नंतर पुजार्याचा मृतदेह ब्लँकेटनं झाकून पळ काढला. गुरुग्राममधील कादरपूर गावात ही घटना घडली असून पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे.
अज्ञातांनी पूजार्याचा केला शिरच्छेद
गावातील प्राचीन मोहन राम मंदिराच्या 90 वर्षीय पुजार्याचा कोणीतरी शिरच्छेद करून हत्या केल्याची माहिती गावात पसरताच कादरपूर गावात खळबळ उडाली आहे. कादरपूरमध्ये सुमारे 40 वर्षे जुनं मोहन रामाचं मंदिर आहे, ज्याला तीजन वाला मंदिर नावानंही ओळखलं जातं. मंदिर बांधलं गेलं तेव्हापासून एक पुजारी मंदिरात पुजेचं काम पाहात होते, ज्याचं नाव गोविंद दास असं होतं. त्यांचं वय जवळपास 90 वर्षे इतकं होतं. मंदिराचे पुजारी गेल्या एक वर्षापासून अर्धांगवायूने त्रस्त असून त्यांना चालता येत नव्हतं. त्यांच्यासाठी मंदिरात एक सेवक ठेवलेला होता, जो मंगळवारी सकाळी त्याच्या गावी गेला आणि त्याच रात्री उशिरा कोणीतरी ही घटना घडवून आणली आहे.


ब्लँकेट हटवताच धक्कादायक घटना उघड
दुसर्या दिवशी सकाळी जेव्हा एक ग्रामस्थ पुजार्याला चहा देण्यासाठी मंदिरात आला तेव्हा अनेकदा आवाज देऊनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. यानंतर गावकर्यानं पुजार्याच्या अंगावरुन ब्लँकेट काढून त्याला पाहिलं असता त्याचं डोकं शरीरापासून वेगळं करण्यात आलं होतं. मंदिराच्या पुजार्याच्या हत्येची माहिती गावात वणव्यासारखी पसरली आणि संपूर्ण गाव मंदिरात जमा झाले.
हत्येचे कारण अस्पष्ट
गुरुग्राम पोलिसांनाही याची माहिती देण्यात आली. त्यानंतर क्राइम डीसीपी, एसीपी, फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आलं. पुजार्याच्या खिशात असलेले पैसे तसेच होते त्यामुळे प्राथमिक तपासात ही चोरीची घटना असल्याचं दिसत नाही. पण नीट चालता न येणार्या 90 वर्षांच्या पुजार्यासोबत वैर काय असू शकते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता गुरुग्राम पोलीस या सर्व बाबींचा तपास करत आहेत.


