भुसावळ ऑर्डनन्सच्या ‘पिनाका लाँचर पॉड’ची पोखरणला यशस्वी चाचणी
डीपीआयसीएम पॉडची डिसेंबरमध्ये केली होती यशस्वी चाचणी ; सहा महिन्यांच्या काळात दुसरे यश
भुसावळ : शहरातील आयुध निर्माणीत तयार करण्यात आलेल्या पिनाका लॉँचर पॉड एमके -1 ची पोखरण येथे, 29 मार्चला यशस्वी चाचणी घेण्यात आली. यामुळे भुसावळ आयुध निर्माणीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
पोखरणला चाचणी यशस्वी
भुसावळ आयुध निर्माणी निर्मित पिनाका लाँचर पॉड एमके -1ची यशस्वी चाचणी झाली. आयुध निर्माणीत दारुगोळा पॅकेजेस तयार होतात. तर पिनाका रॉकेट लाँचर पॉड एमके -1 बनवण्याचे काम 2014 पासून यशस्वीपणे केले जात आहे. यासोबतच आयुध निर्माणीत नवीन प्रकारचे पिनाका रॉकेट पॉड विकसित करण्याचे कामही सुरू आहे. 29 मार्चला पोखरण येथे उन्नत पिनाका रॉकेटची यशस्वी चाचणी घेतली. पिनाका रॉकेटची रेंज 45 किमी आहे. तर पिनाका रॉकेट एमके-1 ची क्षमता 38 किमी आहे. ज्याचे पॉड सध्या भुसावळ आयुध निर्माणीत तयार होतात. चाचणीबद्दल आयुध निर्माणी भुसावळचे महाव्यवस्थापक वसंत निमजे यांनी सर्व अधिकारी व कर्मचार्यांचे कौतुक केले.


रॉकेटची दिशा पॉडवरच अवलंबून
आयुध निर्माणीचे गेल्या सहा महिन्यांतील हे दुसरे यश आहे. डिसेंबर 2021 मध्ये पोखरणमध्ये डिपीआयसीएम पॉडची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. ‘पॉड’ हा रॉकेट प्रक्षेपण यंत्रणेचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. या ‘पॉड’ मधून रॉकेट डागले जाते. रॉकेटचे उद्दीष्ट आणि दिशा पॉड’ वर अवलंबून असते. गाइडेड पिनाका रॉकेटची रेंज 75 किमी आहे, असे जनसंपर्क अधिकारी बी. देवीचंद यांनी सांगितले.
जळगावात त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या : तरुणाविरोधात गुन्हा


