Accident To Pawan Express Near Nashik पवन एक्स्प्रेसला अपघात : जय नगरसाठी पर्यायी रेल्वेने प्रवासी रवाना
भुसावळ : नाशिकजवळच्या लहावीत रेल्वे स्थानकाजवळ डाऊन पवन एक्स्प्रेसचे 11 डबे रेल्वे रूळावरून घसरल्याची घटना रविवारी दुपारी 3.10 वाजेच्या सुमारास घडली होती. या अपघातामुळे रेल्वे प्रशासनाने अनेक गाड्या रद्द केल्या होत्या तर अनेक गाड्यांच्या मार्गात बदल केले होते. दरम्यान, अपघातस्थळी अडकलेल्या प्रवाशांना नाशिक महापालिकेच्या सिटी लिंकच्या बसेसद्वारे नाशिक रोड स्थानकावर आणल्यानंतर रविवारी रात्री 11.55 वाजता स्पेशल जयनगरसाठी सोडण्यात आलेल्या रेल्वेद्वारे रवाना करण्यात आले. विशेष म्हणजे प्रवाशांच्या आरक्षित तिकीटाप्रमाणेच प्रवाशांना बसण्याची व्यवस्था करून देण्यात आली.
नाशिकजवळ पवन एक्स्प्रेसला अपघात : आठ रेल्वे गाड्या रद्द ; चार गाड्यांचे मार्ग बदलले


सिटीलिंकच्या बसद्वारे मोफत वाहतूक
रेल्वे अपघातानंतर नाशिक महानगरपालिकाद्वारा संचलित सिटीलिंकच्या 50 बस तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. त्यातील पहिल्या 10 बसमधूनच प्रत्येकी 75 ते 100 याप्रमाणे प्रवासी नाशिकरोडला सोडण्यात आल्याची माहिती सिटीलिंकचे ऑपरेशन विभागातील अधिकारी अनिल वाघ यांनी दिली.
पवन एक्स्प्रेसला अपघात : आज दुपारपर्यंत रेल्वे वाहतूक सुरू होण्याची आशा
लहावीत ग्रामस्थांनी जोपासली माणुसकी
रविवारी दुपारी 3.10 वाजेच्या सुमारास अपघात झाल्याने प्रवाशांकडील सामानही अस्ताव्यस्त झाले. वृद्ध, महिला, मुले यांची संख्या पाहूनच लहावीत गावातील तरुणांनी ट्रॅक्टर आणि मिळेल त्या वाहनांमधून पाण्यांच्या बाटल्यांचे बॉक्स आणि खाद्यपदार्थ घेऊन घटनास्थळी धाव घेतली. उन्हाचा कहर जाणवत असल्यामुळे अनेकांनी तर प्रवाशांना पिण्यासाठी मोफत पाणी पुरविले. बस, ट्रॅक्टर, अॅम्ब्युलन्स, खासगी प्रवासी टॅक्सी, इतर खासगी वाहने यातून रेल्वेतील प्रवाशांनी नाशिकरोड स्थानक गाठण्यास प्राधान्य दिले.
Passengers of train 11061 boarded the spare train at Nashik and departed at 11.55pm for Jaynagar. pic.twitter.com/qa2Zke85Ut
— Shivaji M Sutar (@ShivajiIRTS) April 3, 2022
वळणामुळे दुसरी लाइन सुरक्षित
जेथे अपघात झाला आहे, तेथील मार्ग वळणाचा आहे. यामुळे अप-डाऊन मार्गाच्या रुळांमध्ये अंतर आहे. याच ठिकाणी वळणावर पवन एक्स्प्रेसचा अपघात होऊन चार डबे रुळांवरून घसरले. सुदैवाने अप लाईन काहीशी लांब असल्याने घसरलेले डबे त्या लाइनवर पडले नाहीत. अन्यथा दोन्ही मार्ग क्षतीग्रस्त होऊन वाहतूक विस्कळीत झाली असती.
55 मिनिटांपूर्वी गेली हावडा मेल
लहवीतजवळ त्या ठिकाणी दुपारी 3.15 वाजता पवन एक्स्प्रेसचा अपघात झाला, त्याच्या 55 मिनिटे आधी या मार्गावरून डाउन मुंबई-हावडा मेल दुपारी 2.20 वाजता मार्गस्थ झाली. यानंतर पवन एक्स्प्रेस अपघातग्रस्त झाली.


