‘आयएनएस विक्रांत’ साठी गोळा केलेल्या पैशांचे काय केले विचारताच किरीट सोमय्यांचा पत्र परीषदेतून काढता पाय


मुंबई : आयएनएस विक्रांतच्या म्युझियमसाठी मोहीम राबवून गोळा केलेल्या पैशांचे काय केले, अशी विचारणा प्रसारमाध्यमांनी करताच भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला अन् ते थेट गाडीत जाऊन बसले.

58 कोटींच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल
आयएनएस विक्रांत प्रकरणात 58 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी माजी सैनिक बबन भोसले यांनी तक्रार दाखल केल्यानंतर सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील यांच्याविरोधात मुंबईच्या ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात कलम 420, कलम 406 आणि कलम 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याच तक्रारीच्या आधारावर सोमय्यांवर 58 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करून पिता-पुत्र तुरुंगात जाणार, असा इशारा दिला आहे.






तांबापुर्‍यातील चिमुकल्याचा विद्युत शॉक लागल्याने मृत्यू

पैसे व्हाईट केल्याचा दावा
711 बॉक्समधून सोमय्यांनी पैसे गोळा केले आणि पीएमसी बँकेच्या माध्यमातून पैसे व्हाईट केले, असा राऊतांचा दावा आहे. गुरुवारी सोमय्या यांनी सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर कारखाना प्रकरणात शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळासह सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकार्‍यांची भेट घेतली. त्यावेळी माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारले.

माजी मंत्री खडसेंसह स्वीय सहाय्यकांसह तत्कालीन भाजपा पदाधिकार्‍यांचा फोन टॅप : पडद्यामागील मुख्य सूत्रधार समोर येण्याची अपेक्षा



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !