आधी पत्नीने प्यायले विष नंतर पतीचीही विहिरीत उडी मारून आत्महत्या


नाशिक : पत्नीने विष प्राशन करताच तिचा मृत्यू ओढवला या नंतर पतीनेही विहिरीत उडी मारत आत्महत्या केली. चांदवड तालुक्यातील खेलदरी येथील या घटनेनेत खळबळ उडाली. वडनेरभैरव पोलीस स्टेशनला पती-पत्नी आत्महत्येप्रकरणी ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद करण्यात आली.

अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीची गळा आवळून हत्या

दाम्पत्याच्या दुर्दैवी मृत्यूने हळहळ
खेलदरी येथील रेखा किरण दौंड (30) या महिलेने शनिवार, 16) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी विष प्राशन केल्याने तिचा भाया बाळासाहेब दौंड यांनी औषधोपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय चांदवड येथे दाखल केल. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केल्याची खबर मुजफ्फर रहेमान पटेल यांनी वडनेरभैरव पोलीस स्टेशनला दिली. ही घटना घडत नाही तोच मृत रेखा दौंड हिचे पती किरण चिंधू दौंड (35, खेलदरी) याने रविवार, 17 रोजी पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास शेतातील विहिरीत पाण्यात उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. याची खबर पुरीचे पोलीस पाटील चिंधू भावराव आव्हाड यांनी वडनेरभैरव पोलीस स्टेशनला दिली. याबाबत दोघांच्या मृत्यूबाबत वडनेरभैरव पोलीस स्टेशनला ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद करण्यात आली.


नाशिक पोलिस आयुक्त दीपक पांडे यांच्या ‘भोंग्याबाबतच्या’ घेतलेल्या या निर्णयाची सर्वत्र चर्चा


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !