50 हजारांच्या किराणा मालावर चोरट्यांचा डल्ला : सावखेडा गावातील घटना


अमळनेर : बंद घरांना टार्गेट केल्यानंतर चोरट्यांनी किराणा दुकानाला टार्गेट करीत 45 हजार 800 रुपयांचा किराणा माल चोरून नेला. ही घटना अमळनेर तालुक्यातील सावखेडा गावात घडली. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुचाकी चोरट्यांचे पोलिसांना आव्हान : जळगावातून दोन दुचाकी चोरीला 

अमळनेर पोलिसात गुन्हा
भंवरलाल पुरखाराम चौधरी (36, सावखेडा, ता.अमळनेर) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास असून गावातील बसस्थानकाजवळ त्यांचे किराणा दुकान आहे. सोमवार, 18 एप्रिल रोजी रात्री आठ वाजता त्यांनी किराणा दुकान बंद करून घर गाठले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी संधी साधत किराणा दुकानाच्या मागील बाजूचा पत्रा उचकावून आत प्रवेश करत दुकानातील किराणा सामान व रोकड मिळून 45 हजार रुपये 800 रुपये किंमतीचा सामान लांबवला. मंगळवार, 19 एप्रिल रोजी सकाळी 7.30 वाजता हा प्रकार लक्षात आला. याप्रकरणी भवरलाल चौधरी यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहे.

खासदार संजय राऊत स्पष्टच म्हणाले तर महाराष्ट्रासोबत उत्तर प्रदेशातही लावावी राष्ट्रपती राजवट


कॉपी करू नका.