दुचाकी चोरट्यांचे पोलिसांना आव्हान : जळगावातून दोन दुचाकी चोरीला


जळगाव : शहरात दुचाकी चोरींचे सत्र सुरूच असून वारंवार होणार्‍या दुचाकी चोर्‍यांमुळे वाहन धारकांमध्ये घबराट पसरली आहे. जळगाव शहर व रामानंद नगर पोलिस ठाणे हद्दीतून दुचाकी चोरीला गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

रामानंदनगर हद्दीतून दुचाकी चोरीला
रामचंद्र देवराम महाजन (हिवरखेडा बुद्रुक, ता.जामनेर) यांनी जळगाव शहरातील आकाशवाणी चौकातील पल्स क्रिटी केअर हॉस्पिटलजवळ रविवार, 23 एप्रिल रोजी रात्री 11 वाजता नातेवाईकांना भेटण्यासाठी आल्यानंतर दुचाकी (एम.एच.19 बी.एल.5527) लावली असता चोरट्यांनी ती लांबवली. रामानंदनगर पोलिस ठाण्यात रविवारी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक अशोक बारी करीत आहे.

चाळीसगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले

शहर हद्दीतूनही लांबवली दुचाकी
जळगाव ः शहरातील गौरी हाइट्स अपार्टमेंट भागातून आशीश किशोर सोनवणे (38) या तरुणांची टीव्हीएस आपाची आरटीआर 160 मॉडेलची दुचाकी चोरट्यांनी शनिवार, 23 एप्रिल रोजी 1.30 वाजतेनंतर चोरट्यांनी लांबवली. रविवार, 24 एप्रिल रोजी सकाळी 11.30 वाजता धाव तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस नाईक योगेश बोरसे करीत आहेत.

जन्मदात्या आईनेच अवघ्या पाच महिन्याच्या चिमुरड्याचे घेतले प्राण


कॉपी करू नका.