धक्कादायक : सख्या बहिण-भावंडांचा शेततळ्यात बुडाल्याने मृत्यू


अहमदनगर : सख्या बहिण भावाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यातील मोधळवाडी परीसरातील शेतातील शेततळ्यात घडली.

दोघा भावंडांचा मृत्यू
शेततळ्यातून पाणी काढतांना पाय घसरल्याने भावाला वाचविण्यासाठी बहिणीने शेततळ्यात उडी घेतली. दुदैवी या घटनेत दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. जयश्री बबन शिंदे (21) आणि आयुष बबन शिंदे (7) अशी मृत बहिण भावाची नावे आहेत.

भावाला वाचवताना बहिणीचा मृत्यू
ननगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील पिंपळगाव मोधळवाडीतील घाणेवस्ती येथे घटना घडली आहे. पिंपळगाव देपा गावांतर्गत असलेल्या मोधळवाडीतील घाणेवस्ती येथे बबन चांगदेव शिंदे हे आपल्या कुटुंबासोबत राहतात. रविवार, 8 मे रोजी सकाळी मुलगी जयश्री व मुलगा आयुष हे दोघे बहिण भाऊ कपडे धुण्यासाठी आपल्याच शेतात असलेल्या शेततळ्यावर गेले होते. आयुष हा शेततळ्यातून पाणी काढत असताना त्याचा पाय घसरला आणि तो शेततळ्यात पडला. भाऊ शेततळ्यात पडला त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी बहिण जयश्री हिने मागचा पुढचा विचार न करता शेततळ्यात उडी मारली. या दुदैवी घटनेत बहिण व भाऊ दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !