किन्हीत खाजगी कर्मचार्यावर अनोळखीकडून हल्ला
भुसावळ- तालुक्यातील किन्ही येथे खाजगी काम करणार्या हेमंत तुळशिराम चौधरी (42, शिक्षक कॉलनी, किन्ही) यांच्यावर अज्ञात इसमाने धारदार वस्तूने हल्ला केल्याची घटना 10 ऑगस्ट रात्री दोन वाजता किन्ही गावात घडली. शिक्षक कॉलनीत तक्रारदार चौधरी यांच्यावर अनोळखी संशयीत आरोपीने लोखंडी धारदार हत्याराने उजव्या मांडीवर तसेच उजव्या हाताच्या मधल्या बोटावर हल्ला चढवला. या घटनेत ते जखमी झाल्याने त्यांना तातडीने गोदावरी रुग्णालयात हलवण्यात आले. तपास पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार
यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रवीण युवराज पाटील करीत आहेत.