फेट्याने आवळला पतीचा गळा नंतर केला आत्महत्येचा बनाव


सिन्नर : फेट्याच्या कापडाने पतीचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी पत्नीला अटक करण्यात आली मात्र पत्नीने पतीच्या आत्महत्येचा बनाव रचला मात्र पोलिसांच्या कसून चौकशीत सत्य समोर आले. वनिता सिताराम गायकर (मुसळगाव, ता. सिन्नर) या महिलेविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या घटनेत सीताराम लक्ष्मण गायकर (42, आहुर्ली, पो.साजेगाव ता. इगतपुरी) असे मयताचे नाव आहे.

वादानंतर पतीची केली हत्या
मुसळगाव हायस्कूल येथे वास्तव्यास असलेल्या सीताराम यांचे पत्नी वनिता हिच्यासोबत त्यांचे काही ना काही कारणावरुन वाद होत असे. दोन दिवसांपूर्वी सिताराम आणि वनिता यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. भिशीचे पैसे भरण्यासाठी पोस्टाचे पैसे द्यावे, अशी मागणी सितारामने केली. याचा राग वनिताला आला. त्यामुळे तिने संतापाच्या भरात फेट्याच्या कापडाने पती सिताराम याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर ती पोलिस स्टेशनमध्ये आली आणि तिने पोलिसांना सांगितले की, पतीने आत्महत्या केली.

संशय येताच बिंग पडले उघडे
याप्रकरणी पोलिसांना संशय आला. त्यांनी या प्रकरणाचा कसून तपास केला. अखेर वनिताने पोलिसांकडे खुनाची कबुली दिली आहे. त्यानुसार, पत्नी वनिता विरुद्ध गुन्हा दाखल करुन तिला अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आर.के.त्रिभुवन, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोरक्षनाथ बलक हे पुढील तपास करीत आहेत.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !