पॅजो रीक्षाला अपघात : नऊ प्रवासी जखमी ; दोघांची प्रकृती चिंताजनक


पारोळा : तालुक्यातील वंजारी फाट्याजवळ प्रवासी वाहून नेणार्‍या पॅजो रीक्षाचा आईसस्क्रीम विकणार्‍या रीक्षेसोबत अपघात झाल्याने नऊ प्रवासी जखमी झाले. पारोळा पोलिसात या प्रकरणी नोंद करण्यात आली. शनिवार, 21 रोजी सायंकाळच्या सुमारास हा अपघात घडला.

दोन रीक्षांमध्ये अपघात
वंजारी फाट्याच्या पुढे बालाजी कोटेक्ससमोर एका आईस्क्रीमची रीरक्षा व प्रवासी वाहतूक करणार्या पॅजो रीक्षाची धडक झाली. या अपघातात नऊ जण जखमी झाले असून यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. अपघाताची माहिती मिळताच परीसरातील ग्रामस्थांनी धाव घेऊन जखमींना रूग्णालयात दाखल केले.

अपघातात हे प्रवासी झाले जखमी
या अपघातात आत्माराम तुकाराम भील (55), कलाबाई आत्माराम भील (50), रामसिंग शायसिंग भील (50), संगीता हिंमत लोणारी (38, राहणार तुराटखेडा तुर्क), नरेंद्र सुरेश पाटील (वय 18, रत्नापिंप्री), मंगला रामा भील (45, रा.दबापिंप्री), मच्छिंद्र चंद्रकांत भील (30, रा.वंजारी), मुजाईद मेहबूब शेख (23, रा.दोंडाईचा), पॅजो रीक्षा चालक मुकेश प्रकाश पवार (पातोंडा), लक्ष्मी हिंमत लोणारी (13), योगीता हिंमत लोणारी (15) हे नऊ जण जखमी झाले. दरम्यान, या अपघातामध्ये संगीता लोणारी, कलाबाई भील या या दोघांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना उपचारासाठी धुळे येथे हलवण्यात आले.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !