मुंबई-रीवा आणि पुणे-जबलपूर साप्ताहिक उन्हाळी विशेष गाड्यांना मुदतवाढ
भुसावळ : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे मुंबई-रीवा आणि पुणे- जबलपूर दरम्यान उन्हाळी विशेष गाड्यांना रेल्वे प्रशासनाने मुदतवाढ दिल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या गाड्यांना मिळाली मुदतवाढ
02188 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-रीवा विशेष गाडी दर शुक्रवारी धावणार असून या गाडीला आता 29 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे तर 02187 रीवा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष गाडीला 28 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. 02131 पुणे-जबलपूर अतिजलद विशेष गाडीला 15 ऑगस्ट 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 02132 जबलपूर-पुणे अतिजलद विशेष गाडीला 14 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, या गाड्यांचे चालण्याचे दिवस, वेळ, संरचना आणि थांबे यामध्ये कोणताही बदल होणार नसल्याने रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.

दोन कोटींच्या लोखंडी सळईंची काळ्या बाजारात विक्री उधळली : दोन टोळ्यातील 13 आरोपी जाळ्यात







