पारोळा तालुक्यात अपघात : वधू पिता टँकरच्या धडकेत ठार


पारोळा : भरधाव टँकरने दुचाकीला उडवल्याने झालेल्या अपघातात कडजी येथील वधू पित्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. महामार्ग क्रमांक सहावरील कडजी गावाजवळ सोमवार. 23 रोजी दुपारी दोन वाजता हा अपघात घडला. या अपघातात अरुण साहेबराव पाटील (73, कडजी) यांचा मृत्यू झाला तर टँकर चालक राहुल झा याला पारोळा पोलिसांनी अटक केली.

टँकर चालकाला अटक
अरुण साहेबराव पाटील यांच्या मुलीचे काही दिवसांवर लग्न येवून ठेपले असतानाच ते किराणा घेण्यासाठी सोमवार, 23 रोजी दुपारी दोन वाजता आपल्या दुचाकीने (क्र.एम.एच.19 डी.एक्स.0478) पारोळा येथे निघाले असताना कडजी गावाजवळ त्यांच्या दुचाकीला राजस्थानकडून येणार्‍या टँकरने (क्र.एम.एच.43-पी.8578) मागून जोरदार धडक दिल्याने अरुण पाटील हे जागीच ठार झाले तर दुचाकीचा चुराडा झाला. अपघातप्रकरणी टँकर चालक राहुल झा याला पारोळा पोलिसांनी अटक केली.



पारोळा शहरातील 27 वर्षीय विवाहितेची आत्महत्या





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !