चाळीसगावातील 14 कृषी दुकानांची भरारी पथकाकडून तपासणी

1 जून रोजी कापूस बियाणे विक्री करण्याची तंबी : तपासणीने उडाली खळबळ


चाळीसगाव : चाळीसगाव शहरातील 14 कृषी दुकानांची मंगळवार, 24 रोजी दिवसभर पंचायत समितीचे कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, वजनमापे निरीक्षक व मंडळ कृषी अधिकारी यांच्या पथकाने तपासणी केल्याने बियाणे विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली. याप्रसंगी विक्रेत्यांना 1 जून रोजी कापूस बियाणे विक्रीच्या सूचना करण्यात आल्या.

कृषी साहित्य दुकानांची झाडाझडती
याप्रसंगी पथकाने दुकानातील पावती पुस्तक, दरपत्रक, साठा रजिस्टर, बिल, बियाण्यांचे भाव आदींबाबत तपासणी केली. वाजवी दरानुसारच शेतकर्‍यांना बियाण्यांचे विक्री करावी तसेच बिलाशिवाय बियाण्यांची विक्री होताना दिसून आल्यास कठोर कारवाईचा इशारा याप्रसंगी देण्यात आला. तपासणी दरम्यान या दुकानांमध्ये त्रृटी आढळल्या त्यांना पूर्तता करण्याची समज देण्यात आली व त्रृटींची आठ दिवसात पूर्तता न झाल्यास नोटीस बजावण्यात येईल, असेही अधिकार्‍यांनी बजावले.

समझोत्याच्या बहाण्याने हल्ला : पसार संशयीत अखेर पोलिसांच्या जाळ्यात


कॉपी करू नका.