समझोत्याच्या बहाण्याने हल्ला : पसार संशयीत अखेर पोलिसांच्या जाळ्यात


जळगाव : समझोत्याच्या तरुणावर प्राणघातक हल्ला त्याच्यावर दगडफेक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पसार संशयीताच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. मयूर जमनादास बागडे (जळगाव) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे.

वरसाडे ग्रामपंचायतीच्या लाचखोर ग्रामसेवकासह सरपंचपती जळगाव एसीबीच्या जाळ्यात

समझोत्याच्या बहाण्याने हल्ला
रामनवमीच्या मिरवणुकीमध्ये झालेल्या वादाचा समझोता करण्यासाठी मयूर बागडे याने आकाश सोनार व ललित दीक्षीत याला मंगळवार, 3 मे रेाजी रात्री आठ वाजेच्या सुमारास कंजरवाड्याजवळील चोखामेळा येथे बोलाविले होते. आकाश हा त्याचे मित्र बबलू धनगर, अविनाश राठोड, निशांत चौधरी याच्यासोबत दुचाकीने आला व आठ ते नऊ जणांसह दोन जणांनी त्यांच्याशी वाद घालून सोबत आणलेल्या कोयत्याने प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न करीत त्यांच्यावर दगडफेक केली होती. याप्रकरणी आकाश सोनार यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अखेर आवळल्या मुसक्या
या गुन्ह्यातील पसार असलेला संशयीत आरोपी मयूर जमनादास बागडे शहरात आल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, इम्रान सय्यद, सुधीर साळवे, किशोर पाटील, सचिन पाटील यांनी सोमवार, 23 मे रोजी रात्री संशयित आरोपी मयूर बागडे याला अटक केली. मंगळवारी 24 मे रोजी न्यायालयात हजर केले असता त्याला पोलिसस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक निलेश गोसावी, किरण पाटील करीत आहे.

प्रेयसीसोबत शारीरीक संबंध ठेवताना प्रियकराचा मृत्यू 


कॉपी करू नका.