!-- afp header code starts here -->

परीवहन मंत्री अनिल परबांशी निगडीत सात ठिकाणी ईडीची छापेमारी


मुंबई : शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परीवहन मंत्री अनिल परब यांच्याशी निगडीत तब्बल 7 मालमत्तांवर गुरुवारी सकाळपासूनच ईडीकडून धाडी टाकण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

सात ठिकाणी एकाचवेळी छापेमारी
अनिल परब यांच्या संबंधित अशा एकूण सात ठिकाणी ईडीकडून धाडसत्र सुरू करण्यात आले आहे. परब यांच्या शासकीय निवासस्थान, वांद्रे येथील निवासस्थानी आणि पुणे व दापोलीच्या मालमत्तांचा त्यात समावेश आहे. ईडीकडून छापेमारी सुरू करण्यात आली असल्याचं वृत्त समोर येत आहे. ईडीचे अधिकारी आले तेव्हा अनिल परब घरी नव्हते, असे सांगण्यात येते. वांद्रे येथील परब यांच्या घरी ईडीच्या अधिकार्‍यांसोबत उठझऋ चे सुरक्षा रक्षकही उपस्थित आहेत. मंत्री अनिल परब यांच्या मालमत्तांवर ईडीकडून धाडसत्र सुरू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीपूर्वी झालेल्या या कारवाईमुळे शिवसेनेला एक मोठा झटका असल्याचे बोलले जात आहे.

आर्थिक अनियमिततेचा आरोप
विभास साठे यांच्याकडूनच दापोलीत अनिल परबांनी रिसॉर्ट खरेदी केला होता. याच रिसॉर्टच्या बांधकामासाठी झालेल्या आर्थिक व्यवहारात मोठी अनियमितता झाल्याचा आरोप आहे आणि त्याच संदर्भात ही छापेमारी सुरू असल्याचे सांगितले जाते. पुण्यात विभास साठे यांच्या निवासस्थानी ईडीकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. पुण्यातील पलेडियम इमारतीत साठे यांचे घर आहे.

 


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !