Dhule Accident शालकासह मेहुण्याचा दुचाकी अपघातात मृत्यू : धुळ्यातील घटना


Sister-in-law dies in two-wheeler accident: Incident in Dhule धुळे : शालकासह मेहुण्याचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला. पारोळा रोडवरील पुलावर अचानक थांबलेल्या ट्रॅक्टरवर दुचाकी आदळल्याने ही घटना घडली. रविंद्र लालदास शिंदे (27, रा.वडजाई, ता.धुळे) व त्यांचा शालक जयशंकर वाघ (19, रा.डहाणू, जि.पालघर) अशी मयतांची नावे आहेत.

जळगावात फ्रीज भरलेल्या कंटेनरला आग : 30 लाखांवर नुकसान 

ट्रॅक्टरवर आदळली दुचाकी
शुक्रवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास दुचाकीने (एम.एच.18 ए.क्यु.6178) दोघे जात असताना पारोळा रोडवरील पुलावर त्यांच्या पुढे चालणार्‍या ट्रॅक्टर चालकाने अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे दुचाकी ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकली. त्यात दोघे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. (Dhule Accident) याबाबत आनंदा कृष्णा शिंदे यांनी आझादनगर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रॅक्टर चालक इंद्रजित उत्तम सैंदाणे (45 रा. आंबेडकर पुतळ्याच्या मागे फागणे ता. धुळे) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तपास पीएसआय लक्ष्मी करंकर या करीत आहेत.



तरडीजवळ भीषण अपघात : अकोल्यातील दोघे ठार 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !