भुसावळात कत्तलीपूर्वीच बैलांची सुटका
बाजारपेठ पोलिसांच्या कारवाईत 12 बैलांना जीवदान ; संशयीत आरोपींचा शोध
भुसावळ- कत्तलीच्या उद्देशाने शहरातील मिल्लत नगर भागात बैल मोठ्या प्रमाणावर आणल्याची माहिती मिळाल्यानंतर रविवारी रात्री बाजारपेठ पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात 12 बैलांची सुटका केली मात्र ही बैल कुणी व का आणली? याची माहिती पोलिसांना कळू शकली नाही. रविवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या कारवाईने या भागात मोठी खळबळ उडाली तर नागरीकांनीही गर्दी केल्याने पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर या भागात गस्त सुरू केली. सुटका झालेल्या बैलांची जळगावच्या पांझरपोळ येथे रवानगी करण्यात आली.