यावल शहरातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले


यावल : यावल शहरातील फॉरेस्ट कॉलनीतून अल्पवयीन मुलीला अज्ञाताने फूस लावून पळवून नेले. याबाबत यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
यावल शहरातील फॉरेस्ट कॉलनीत मावशीकडे 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी वास्तव्याला आहे. शनिवार, 4 जून रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी घरी एकटी असतांना अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. याबाबत पीडीत मुलीच्या मावशी व मावसा यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र ती मिळून न आल्याने त्यांनी रविवार, 5 जून रोजी यावल पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्याने अज्ञात व्यक्तीविरोधात यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक फौजदार असलम खान दिलावर खान करीत आहेत.

जेसीबी चालकाच्या हलगर्जीपणामुळे कामाख्या एक्स्प्रेसला जेसीबी धडकला : दोघांविरोधात गुन्हा










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !