भुसावळातील रेल्वे यार्डात अनोळखी महिलेचा मृत्यू


भुसावळ : लोहमार्ग पोलिसांना 40 वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला असून ओळख पटवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. खांबा किलोमीटर क्रमांक 445/14/16 जवळील नाल्याजवळ 2 जून रोजी 40 वर्षीय अनोळखी महिला मयत स्थितीत आढळली.

ओळख पटवण्याचे आवाहन
उंची पाच फूट, नाक सरळ, रंग काळा-सावळा, शरीरबांधा सडपातळ, डोक्याचे केस काळे, चेहरा लांबट, उजव्या हाताच्या मनगटावर सी.एन.मारावती सिनामसिंह असे गोंदलेले आहे. अंगात पिवळ्या रंगाचा पेटीकोट, अंगात राखाडी व मळकट रंगाचा पंजाबी कुर्ता असे वर्णन आहे. मयताची ओळख पटत असल्यास भुसावळ लोहमार्ग पोलिसांशी तसेच नाईक प्रवीण राजगुरे (7038089615) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !