मोठा दिलासा : उद्यापासून सुरत-भुसावळ पॅसेंजर धावणार


भुसावळ : सुमारे अडीच वर्षांपासून कोरोनाकाळात बंद असलेली सुरत भुसावळ पॅसेंजर बुधवार, 8 जूनपासून धावणार आहे. पॅसेंजर बंद असल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत होते मात्र कोरोना कमी झाल्याने रेल्वेकडून अनेक गाड्या सुरू करण्यात येत आहे. त्यात आता सुरत-भुसावळ पॅसेंजर सुरू होत असल्याने खान्देशातील व्यापारी, उद्योजक, व्यावसायिकांसह चाकरमानी व सर्वसामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.

अडीच वर्षानंतर थांबणार गैरसोय
देशात कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून मार्च 2020 पासून रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या त्यानंतर रेल्वेकडून विशेष आरक्षित गाड्या सुरु करण्यात आल्या होत्या मात्र पॅसेंजर गाड्या बंद असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत होते. भुसावळ येथून गेल्या काही महिन्यापूर्वी पॅसेंजर गाड्यांऐवजी मेमू गाड्या सुरू करण्यात आल्या होत्या. त्यात मात्र सुरत-भुसावळ पॅसेंजर बंदच होती. मात्र आता रेल्वेने सुरत-भुसावळ करण्याचा निर्णय घेतल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.

असे आहे गाडीचे वेळापत्रक
गाडी क्रमांक 19005 सुरत-भुसावळ पॅसेंजर ही गाडी 8 जून रोजी रात्री 11.10 वाजता सुरत स्थानकातून सुटेन, तर दुसर्‍या दिवशी ही गाडी सकाळी 7.55 वाजता भुसावळ स्थानकात पोहोचणार आहे. तर गाडी क्रमांक 19006 भुसावळ-सुरत पॅसेंजर 9 जूनपासून सायंकाळी 7.30 वाजता भुसावळ रेल्वे स्थानकातून सुटून दुसर्‍या दिवशी पहाटे 5.15 वाजता सुरत स्थानकात पोहोचणार आहे.

सुरतहून रात्री 11.10 वाजता सुटणार पॅसेंजर
ही गाडी 8 जून रोजी रात्री 11.10 वाजता सुरत स्थानकातून सुटेल. त्यानंतर उधना 11.20, बारडोली 11.58, व्यारा मध्यरात्री 12.31, नंदुरबार 2.40, दोंडाईचा 3.30, शिंदखेडा 3.59, नरडाणा 4.18, अमळनेर 5.3, धरणगाव 5.47, पाळधी 6.40, जळगाव 7.10, भुसावळ 7.55 वाजता पोहोचल.

गाडी क्रमांक 19006 भुसावळ-सुरत पॅसेंजर
ही गाडी 9 जूनपासून सायंकाळी 7.35 वाजता भुसावळ रेल्वे स्थानकातून सुटेन. त्यानंतर जळगाव येथे रात्री 8.10, पाळधी 8.30, धरणगाव 8.59, अमळनेर 9.33, नरडाणा 10.16, शिंदखेडा 10.50, दोंडाईचा 11.18, नंदुरबार 12.25, व्यारा 2.31, बारडोली 3.43, उधना 4.35, सुरत पहाटे 5.15 वाजता पोहोचेल.

 










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !