बुलेट घेण्यासाठी माहेरुन एक लाख रुपये न आणल्याने यावलच्या विवाहितेचा छळ
यावल : शहरातील बाबानगरातील माहेर असलेल्या शाहिस्ताबी सैय्यद जुबेर अहेमद (30) बुलेटसाठी माहेरून एक लाख रुपये न आणल्याने तिचा छळ करण्यात आला. विवाहादरम्यान विवाहितेला माहेरूहून पायात चांदीच्या चैन पट्ट्या, सोन्याची अंगठीसह 80 हजार रुपयांचे दागिने तिच्या वडिलांनी दिले होते. हे सर्व दागिने तिच्या माहेरच्या लोकांनी काढून घेतले व आता बुलेट घेण्यासाठी माहेरुन एक लाख रुपये आण, असा तगादा विवाहितेच्या पतीने तिच्या मागे लावला. विवाहितेकडून त्यांची मागणी पूर्ण न झाल्याने तिला माहेरी यावलला सोडून देण्यात आले.
पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा
या प्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून पती सै.जुबेर अहमद सै.खलील अहमद, सासरे सै.खलील अहमद सै. मोहसीन, सासु फातेमाबी सै.खलील, दीर सै.मुजम्मिल सै.खलील, दिराणी नजतबी सै.मुजम्मिल, नणंद नुसतबी मर्द गफुर शेख, नणंद इशरत परविन सै. खलील (सर्व रा.जाम मोहल्ला, न्यू बाबला हॉटेलजवळ, भुसावळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक फौजदार असलम खान दिलावर खान करीत आहेत.
सात महिन्यांपासून पसार महिला आरोपी एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात







