शिंदखेडा तहसीलचा लाचखोर अव्वल कारकून एसीबीच्या जाळ्यात

मतदार यादीतील नाव दुरुस्तीसाठी शंभर रुपयांची लाच भोवली


धुळे : मतदार यादीतील नाव दुरुस्तीसाठी शंभर रुपयांची लाच मागून ती स्वीकारणार्‍या शिंदखेडा तहसील कार्यालयातील अव्वल कारकून गणेश दिगंबर पिंगळे (52, रा.सूर्योदय कॉलनी देवपूर, धुळे) यास धुळे एसीबीच्या पथकाने बुधवारी दुपारी लाच स्वीकारताच अटक केली. या कारवाईने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली.

अवघ्या शंभर रुपयांची लाच भोवली
32 वर्षीय तक्रारदार यांच्या आईचे नाव भुराबाई नानसिंग गिरासे असे असून त्यांचे आईचे नाव मतदार यादीत चुकीने उजनकोरबाई नानसिंग गिरासे असे नमूद आहे त्यामुळे त्यांचे आईस मतदान करण्यास तसेच निवडणुकीचा नामनिर्देशन फॉर्म भरण्यास अडचणी येत होत्या. मतदार यादीतील आईचे नाव दुरुस्त करण्यासाठी वरील दोन्ही नावाचे व्यक्ती एकच असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्रावर नमूद माहिती साक्षांकन करण्याचे मोबदल्यात आरोपी अव्वल कारकून गणेश दिगंबर पिंगळे यांनी तक्रारदार यांच्याकडे बुधवारी शंभर रुपयांची लाच मागितली होती व त्याबाबत तक्रार केल्यानंतर पडताळणी होवून सापळा रचण्यात आला. आरोपीला लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली.

यांनी केला सापळा यशस्वी
धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रकाश झोडगे, पोलीस निरीक्षक
मंजितसिंग चव्हाण, राजन कदम शरद काटके, कैलास जोहरे, भूषण खलाणेकर, भूषण शेटे, संतोष पावरा , संदिप कदम, गायत्री पाटील, चालक सुधीर मोरे, जगदीश बडगुजर आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !