भुसावळ ऑर्डनन्स महाव्यवस्थापकपदी अनुराग एस. भटनागर
भुसावळ : भुसावळ आयुध निर्माणीच्या महाव्यवस्थापकपदी अनुराग एस.भटनागर यांची निवड झाली असून नुकताच त्यांनी पदभार स्वीकारला आहे. सर्व अधिकारी, युनियन असोसिएशनचे पदाधिकारी जेसीएम थ्री जेसीएम फोर्थ मेंबर कार्यसमिति सदस्य व कर्मचार्यांनी त्यांचे स्वागत केले. भटनागर म्हणाले की, गेली 32 वर्षे आयुध निर्माणी संघटनमध्ये असताना देशाची सेवा केल्याचा मला अभिमान आहे. ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ ही संरक्षण उत्पादनांसाठी पॅकेजिंग बॉक्स आणि पिनाका पॉड्स इत्यादींच्या उत्पादनांचा दर्जा आणि उत्पादकता वाढविण्याच्या आपल्या संकल्पाचा पुनरुच्चार करून प्रशासनात संपूर्ण पारदर्शकता आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.







