भुसावळ विभागात बारावी परीक्षेत विद्यार्थिनीच टॉपर
निकालानंतर विद्यार्थ्यांचा जल्लोष : विविध शाखांकडे वळण्याचा विद्यार्थ्यांचा कल
भुसावळ : बारावी परीक्षेचा बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास निकाल जाहीर होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठी उत्सकुता लागून होती. निकाल हाती पडताच विद्यार्थ्यांनी जल्लोष केला तर यंदादेखील विद्यार्थिनींनीच टॉपर आल्याचे दिसून आले.
दा.दे.ना.भोळे महाविद्यालय, भुसावळ
भुसावळ : दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयाचा बारावी विज्ञान विभागाचा शंभर टक्के निकाल लागला. या शाखेतून
प्रथम- ओम मिलिंद धांडे (92.67), व्दितीय- विविस्ता सुनील रत्नांनी (90.17), तृतीय- अमेय अभय जावळे (89.83) आला. बारावी कला विभागाचा 72.41 टक्के निकाल लागला. प्रथम- मुखर्जी महिमा सुबिप्त (72.33), द्वितीय- वैशाली अरुण पवार (59.17), तृतीय कानोजिया हर्ष ओमप्रकाश (58.33) आला. बारावी वाणिज्य विभागाचा 95.83 टक्के लागला. प्रथम- अदिती प्रकाश सावळे (89.33) व शेख झारा अल्ताफ (89.33), द्वितीय- नेहा देविदास मकारे (74.50), तृतीय- येखंडे सायली गजेंद्र (72.17) आली. यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक, सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी अभिनंदन केल्याचे प्रसिद्धी प्रमुख प्रा.डॉ.एस.डी.चौधरी कळवतात.
सावदा पालिका संचलित हायस्कूलचा शंभर टक्के निकाल
सावदा : सावदा पालिका संचलित श्रीमती आनंदीबाई गंभीरराव हायस्कुल व नामदेवराव गोमाजी पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा 12 वी विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के लागला. प्रथम- गार्गी रेवानंद बेंडाळे (88 टक्के), द्वितीय- श्रध्दा सतीश खारे (85.33), हर्षद संजय सोनवणे (85.33 टक्के) आला तर बारावी कला शाखेचा निकाल 95.08 टक्के लागला. प्रथम- जयश्री सोपानचौधरी (82.67 टक्के), द्वितीय- पूजा प्रकाश भोई (78.33 टक्के) आली. बारावी विज्ञान शाखेचा शंभर टक्के तर कला शाखेचा 95.08 टक्के निकाल लागला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशासक कैलास कडलक, मुख्यधिकारी किशोर चव्हाण, नगरसेवक, पदाधिकारी व मुख्याध्यापक सी.सी.सपकाळे, पर्यवेक्षक जे.व्ही. तायडे, व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
खिर्डी विद्यालयाचा 97.18 टक्के निकाल
खिर्डी : अभिषेक भास्कर पाटील माध्यमिक विद्यालय व हरी लक्ष्मण पाटील जुनिअर कॉलेज कला शाखेचा बारावीचा निकाल 97.18 टक्के लागला. प्रथम- भाग्यश्री रघुनाथ पाटील (82.50), द्वितीय- दीक्षा चिंतामण गाढे (81.17), तृतीय- दीशा प्रमोद पाटील (80.50), तेजल मिलिंद कोळी (80.50) आली. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष विजय पाटील, उपाध्यक्ष विठ्ठल पाटील, सचिव अरुण पाटील, चेअरमन निरज पाटील व सर्व संस्थेचे पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक पी.एस.चौधरी, पर्यवेक्षिका किर्ती महाजन, सर्व शिक्षक-शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
ऐश्वर्या राजपूत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण
भुसावळ : शहरातील के.नारखेडे विद्यालयाची विद्यार्थिनी ऐश्वर्या संदीप राजपूत हे बारावी सायन्स शाखेतून 78.67 टक्के गुण मिळवून विशेष प्राविण्यासह उर्त्तीर्ण झाली. बायोलॉजी व आयटी विषयात तिने विशेष प्राविण्य मिळवले आहे. भुसावळ शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी संदीप राजपूत यांची ती कन्या आहे. तिने मिळवलेल्या यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.







