भुसावळात उद्या आधुनिक सावित्रींचा होणार सन्मान


भुसावळ : आधुनिक युगात कुटुंबाची जबाबदारी यशस्वीपणे पेलणार्‍या आधुनिक सावित्रींच्या सन्मान सोहळ्याचे शहरातील माजी नगरसेवक युवराज लोणारी व माजी नगरसेविका मीना लोणारी यांच्यातर्फे आयोजन करण्यात आले आहे.

महिलांना सहभागाचे आवाहन
मंगळवारी सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत अटलबिहारी वाजपेयी नाना-नानी उद्यान, काशीराम नगरात वटपूजेसाठी येणार्‍या भगिणींचा भेटवस्तू देवून सन्मान करण्यात येणार आहे. पूजेसाठी यावेळी ब्राह्मणाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. भगिणींनी या कार्यक्रमास उपस्थिती द्यावी, असे आवाहन माजी नगरसेवक युवराज लोणारी व माजी नगरसेविका मीना लोणारी यांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !