21 वर्षीय तरुण विवाहितेचे अपहरण करीत बस चालकाचा अत्याचार
पुणे : बाहेर गावावरून पतीसोबत पुण्यात आलेली तरुण विवाहिता पुण्यात राहण्यासाठी खोली शोधत असता आरोपीने या दाम्पत्याला ट्रॅव्हल्समध्येच झोपण्यास सांगितले त्यानंतर ट्रॅव्हल्स अचानक सुरू करून कात्रज परीसरात घेऊन जात महिलेवर बलात्कार केला. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. पती वॉशरूमला जातच त्याने हे कृत्य केल्याची बाब उघड झाली. या प्रकरणी चालक नवनाथ शिवाजी भोंग (38) याला पोलिसांनी अटक केली. स्वारगेट पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
ट्रॅव्हल्समधून पळवून नेत अत्याचार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला 21 वर्षे वयाची असून वाशीम जिल्ह्यातील आहे. ही महिला पतीसोबत पुण्यात आली होती. पुण्यात दोघे राहण्यासाठी खोली शोधत होते. रात्र झाल्यामुळे आरोपी भोंग याने या दाम्पत्याला ट्रॅव्हल्समध्ये झोपण्यास सांगितले. दोघेही नवीन असल्याने त्यांनी ट्रॅव्हल्समध्ये झोपण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही वेळाने महिलेचे पती वॉशरूमला गेले.
पोलिसांकडून चालकाला अटक
दरम्यान पती वॉशरूमला गेल्याचे पाहून आरोपी भोंग याची नियत फिरली. त्याने अचानक गाडी सुरू केली आणि महिलेचे अपहरण केले. त्यानंतर स्वारगेट बस स्थानकाच्या परिसरात फुटपाथवर या महिलेला नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. तर पुन्हा बस कात्रज परिसरात नेली आणि तेथील फुटपाथवर दुसर्यांदा बलात्कार केला. दरम्यान महिलेचा तिला शोधत होता. पण, बस व पत्नी न सापडल्याने त्याने पोलिसांकडे धाव घेतली आणि त्यानंतर हा प्रकार उजेडात आला. पोलिसांनी चालकाला अटक केली आहे.