फैजपूरसह किनगावातून दुचाकी चोरीला


Two-wheeler Stolen from Kingawa including Faizpur यावल : तालुक्यातील किनगाव येथील गॅरेज समोरून एकाची 20 हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेण्यात आली. गणेश राजेंद्र पाटील (किनगाव) याने त्याचे मामा भागवत मुरलीधर पाटील यांची दुचाकी (एम.एच.18 यु.के.0749) किनगाव येथील दीपक ऑटो गॅरेजसमोर शनिवार, 11 जून रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पार्किंग केली मात्र चोरट्यांनी दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. सोमवार, 13 जून रोजी दुपारी दोन वाजता यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल नरेंद्र बाबुले करीत आहे.

फैजपूरातील आठवडे बाजारातून दुचाकी चोरीला
फैजपूर : शहरातील आठवडे बाजारातून तरुणाची 25 हजार रुपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. अनिल भावसिंग भिलाला (वय-26, मोहमांडली, ता.रावेर) या तरुणाने गुधवार, 8 जून रोजी दुपारी तीन वाजता दुचाकी (एम.एच. 19 डी.ई.5074) ने फैजपूर शहरात कामानिमित्त आला असता आठवडे बाजारातील ओमक्लॉथ समोर त्याने दुचाकी पार्क केली मात्र चोरट्यांनी संधी साधली. सोमवार, 13 जून रोजी रात्री 10 वाजता फैजपूर पोलिस अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार रवींद्र मोरे करीत आहे.

घरफोडीसह बँक लुटीच्या प्रयत्नातील आरोपी एलसीबीच्या जाळ्यात


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !