जलचक्र गावातून दोन लाखांच्या पशूधनाची चोरी


बोदवड : तालुक्यातील जलचक्र येथील शेत-शिवारातील गट क्रमांक 41/1 मधील गुरांच्या वाड्यातून चोरट्यांनी मंगळवारी रात्री दोन ते सकाळी सहा वाजेच्या सुमारास एक लाख चाळीस हजार किंमतीची भुरकट रंगाची शिंगे व गोल निळे रंग लावलेले शिंगे असलेली बैल जोडी तसेच 40 हजार रुपये किंमतीचे दोन लहान गोर्‍हे तसेच 14 हजार रुपये किंमतीची पांढर्‍या रंगाच्या दोन लहान गाय म्हणून एक लाख 94 हजारांचे पशधून लांबवले. या प्रकरणी रामदास लक्ष्मण पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार संतोष चौधरी करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !