भुसावळात आज सीआरएमएसचा विविध मागण्यांसाठी मोर्चा
भुसावळ : मनमानी पद्धत्तीने पदांचे अंदाधुंद आत्मसमर्पण थांबवावे, गैर सुरक्षा श्रेणीतील 50 टक्के रीक्त जागा आत्मसमर्पण करण्याचा आदेश तत्काळ मागे घेण्यात यावा, दरवर्षी दोन टक्के पद आत्मसमर्पण करण्याचा आदेश मागे घ्यावा, एनपीएस बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, नाईट ड्युटी कमाल भत्त्याची मर्यादा तत्काळ हटवावा आदी मागण्यांसाठी सेंट्रल रेल्वे मजदूर संघ (सीआरएमएस) तर्फे बुधवार, 15 रोजी सायंकाळी पाच वाजता रेल्वे मैदान ते डीआरएम कार्यालयादरम्यान विशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन सीआरएमएसचे मंडळ सचिव एस.बी.पाटील, मंडळ सचिव वर्कशॉप किशोर भागवत कोलते, मंडळ समन्वयक एस.के.दुबे, मंडळ संघटक पी.के. रायकवार, महिला अध्यक्ष कुंदलता थूल आदींनी केले आहे.