गणवेशासह पुस्तकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत
स्कूल चले हम : पहिल्याच दिवशी भुसावळसह विभागात शाळांमध्ये विद्यार्थ्यांची तोबा गर्दी : कोरोना अनुषंगाने उपाययोजना
भुसावळ : तब्बल दोन वर्षानंतर कोरोनाचे संकट ओसरल्यानंतर बुधवार, 15 जूनपासून शहर व विभागात शाळांना सुरूवात झाल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये समाधानाचे वातावरण होते तर शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, पुस्तके व गणवेश देवून स्वागत करण्यात आले तर शाळेच्या पहिल्याच वर्गात प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी व शाळेची गोडी लागण्यासाठी काही ठिकाणी बॅण्डच्या तालावर मिरवणूकही काढण्यात आली. शाळा प्रवेशाच्या स्वागताने विद्यार्थीही भारावल्याचे दिसून आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी अनेक ठिकाणी पालक संपर्क मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. वर्षभरातील उपक्रम, विद्यार्थ्यांना द्यावयाच्या सूचना यावेळी सांगण्यात आल्या. कोरोनाच्या अनुषंगाने शाळास्तरावर काळजीही घेण्यात आली.
अनैतिक संबंधाची माहिती घरच्यांना सांगण्याच्या धमकीमुळे प्रियकराने केली विवाहित प्रेयसीची हत्या
बियाणी मिलिटरी स्कूल
भुसावळ : शहरातील बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये शाळेच्या पहिल्याच विदशी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी संस्थाध्यक्ष मनोज बियाणी, सचिव डॉ.संगीता बियाणी, रौनक बियाणी, प्रिन्सीपल डी.एम.पाटील यांनी बुके देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. याप्रसंगी शाळा परीसर स्वच्छ करण्यात आला होता. शाळेत जागोजागी बलून व स्वागत फलक लावण्यात आले. विद्यार्थांच्या येण्याच्या मार्गावर रांगोळ्या काढण्यात आल्या व आलेल्या विद्यार्थांच्या अंगावर फुलांची उधळण करण्यात आली. विद्यार्थ्यांची प्रसंगी वैद्यकीय तपासणी करण्यात आली. शाळेतील विद्यार्थी व शिक्षक वर्ग उपस्थित होते.

म्युनिसिपल हायस्कूल, भुसावळ
भुसावळ : म्युनिसिपल हायस्कुलमध्ये विद्यार्थी प्रवेशोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. प्रारंभी विद्यार्थ्यांचे टेंपरेचर व ऑक्सिजन मोजण्यात आले. सॅनिटायझर करण्यात आले व विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक ललित कुमार फिरके यांच्याहस्ते पुस्तक वाटप करण्यात आले तसेच सर्वांना गोड पदार्थ म्हणून बुंदीचे लाडू देण्यात आले. मालती भिरूड, प्रगती मेने, एन.बी.वाडे, सरला सावकारे, एस.एन.बनसोडे, डॉ.प्रदीप साखरे, डी.के.भंगाळे, एन.एच.राठोड, संध्या धांडे, के.पी.बेंडाळे, नाना पाटील, रेखा सोनवणे, एम.एच.किरंगे, ग्रंथपाल अरुण नेटके, लक्ष्मण पवार व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ.प्रदीप साखरे तर आभार ग्रंथपाल अरुण नेटके यांनी मानले.
अहिल्यादेवी कन्या विद्यालय
भुसावळ : श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचालित अहिल्यादेवी कन्या विद्यालयात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापिका मानसी कुलकर्णी, पर्यवेक्षक संजीव पाटील यांनी विद्यार्थिनींना गुलाबपुष्प देऊन तसेच नवीन शैक्षणिक वर्षाची पाठ्यपुस्तके देऊन सन्मानित केले. यावेळी मुख्याध्यापिका मानसी कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात शाळा म्हणजे व्यक्तिमत्व विकासाचे केंद्र असून शाळेमध्ये अभ्यासाबरोबरच कला, क्रीडा या विषयक अनेक उपक्रम राबविले जातात त्यामुळे विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये होत असलेल्या विविध उपक्रमात उत्साहाने सहभाग घ्यावा व व्यक्तिमत्वाचा विकास घडवून आणावा, असे आवाहन केले. सूत्रसंचालन नाना पाटील व प्रशांत देवरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
महाराणा प्रताप विद्यालय, भुसावळ
भुसावळ : महाराणा प्रताप विद्यालयात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन शाळेचे मुख्याध्यापक शिंदे व पर्यवेक्षक घोडके यांच्याहस्ते स्वागत करण्यात आले. जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची बंँड पथकासह प्रभात फेरी काढण्यात आली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर पुष्पवर्षाव करून त्यांचे स्वागत केले. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय होती. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शासनातर्फे दिल्या जाणार्या मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.
कंडारी जिल्हा परीषद शाळा
भुसावळ : कंडारी येथील जिल्हा परीषद मराठी शाळेत शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा प्रवेशोत्सव अंतर्गत पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. पहिलीच्या विद्यार्थ्यांचे पूजन करून त्यांनाही पुष्प देऊन पाठ्यपुस्तके देण्यात आली. त्यानंतर मार्गदर्शनपर विविध स्टॉल लावून नवोगत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. मुख्याध्यापक संतोष वानखेडे, रमेश सूर्यवंशी, मंजुषा पाठक, सुनंदा रोझतकर, सविता निंभोरे, ज्योती वाघ, विनोद जयकर, गणेश तांबे, डॉ.जगदीश पाटील आदी शिक्षकांसह अंगणवाडी सेविका भारती सुर्वे, भिकुबाई मोकाशे, मंगला कुंभार, मदतनीस विमलबाई सुर्वे, पूनम सुर्वे, यमुना धनगर यांनी स्टॉलचे नेतृत्व केले. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. त्यानंतर निपुण भारत अभियानांतर्गत पालक मेळावा घेण्यात आला. पालक मेळाव्यात जळगाव गटसाधन केंद्राचे विषयतज्ञ विलास सूर्यवंशी, पंचायत समिती आस्थापना विभागाचे निशांत मोरे, मुख्याध्यापक संतोष वानखेडे, रमेश सूर्यवंशी व्यासपीठावर उपस्थित होते. सूत्रसंचालन ज्योती वाघ यांनी करून निपुण भारत अभियानाची माहिती दिली. सुनंदा रोझतकर यांनी आभार मानले. यावेळी पालकांसह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
श्री.ति.र.बरडीया मराठी शाळा, बोदवड
बोदवड : तालुक्यातील श्री ति.र.बरडीया मराठी शाळेमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. पहिलीत नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका काठोके व प्रगती बालवाडीच्या मुख्याध्यापिका सुनीता पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना बिस्किट वाटप तसेच मध्यान्ह भोजनात जिलेबी वाटप करण्यात आली. शाळेच्या पहिल्या दिवशी मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते. उपस्थित पालकांचे सुद्धा स्वागत करण्यात आले,. शाळेच्या मुख्याध्यापिका काठोके यांनी मुलांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन संदीप पारधी यांनी केले.
प्राथमिक आश्रमशाळा शेंगोळे
शेंगाळे : प्राथमिक आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व पुस्तक संच व वह्या देऊन शाळा स्वागत करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे सेक्रेटरी दादासाहेब धर्मराज पाचोरे, प्राथमिक आश्रमशाळेचे प्रभारी मुख्याध्यापक अमोल वानखेडे, उपशिक्षक अब्दुल तडवी, अविनाश पाटील, वसतिगृह अधीक्षक गजानन सोनोने, शिक्षकेत्तर कर्मचारी राजू पवार, ताराबाई पाटील, शीतल वानखेडे उपस्थित होत्या. या उपक्रमाबद्दल संस्थेचे संचालक जितेंद्र बाबुराव पाटील व प्रवीण धर्मराज पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
खिर्डी खुर्द जि.प.शाळा
खिर्डी : गावातील जिल्हा परीषद शाळेत शाळा प्रवेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. प्रसंगी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले तसेच मोफत पाठ्यपुस्तकेही वाटप करण्यात आली. प्राथमिक विद्या मंदिर खिर्डी खुर्द शाळेत मुख्याध्यापक भूषण अमृत पाटील यांच्याहस्ते विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले आहे. या वेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
चंद्रकांत बढेंसह सात संचालकांना बुलढाणा सीआयडीकडून अटक
