Gulabrao Patil गुलाबराव पाटलांची संजय राऊतांवर पलटवार : चुना कसा लावतात हे दाखवून देणार


Gulabrao Patil’s retaliation against Sanjay Raut: It will Show how lime is Applied जळगाव : सेनेतील बंडखोर आमदारांवर निशाणा साधताना खासदार राऊत (MP Sanjay Raut) यांनी माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टिकेचे बाण चालवत त्यांना पुन्हा पानटपरीवर बसवू, असा इशारा दिला होता. या टिकेला उत्तर देताना गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर देत चुना कसा लावतात? हे दाखवून देवू, असे सांगितले आहे.

धुळ्यातील अवैध सावकारी प्रकरण : आरोपी संजय बंब जाळ्यात

त्या दंगलीवेळी राऊत कुठे होते ?
गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) राऊतांचा समाचार घेत म्हणाले की, आपल्या सर्वांवर जिल्ह्यात विविध प्रकारचे आरोप करण्यात येत आहे; पण आपल्या पाठिशी देखील अनेक लोक उभे राहत असल्याचे दिसून येत आहे. आपण सर्व एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी आलो आहोत. आपण सर्व बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादमुळे या पदापर्यंत पोहचलो; पण आमची स्टोरी जर संजय राऊतांना सांगितली, तर 1992 च्या दंगलीत आम्ही तिघे भाऊ आणि माझे वडील जेलमध्ये होतो. तेव्हा संजय राऊत कुठे होते माहिती नाही.

पक्ष वाढवण्यात आमचाही मोठा वाटा
आमच्या वाटचालीत पक्षाचा वाटा असला तरी आमचीही मेहनत आहे. ही मेहनत संजय राऊत यांना कळणार नाही. आम्ही काय आयत्या बिळावर नागोबा नाहीत. पक्षासाठी केस कशी अंगावर घेतात हे राऊत यांना माहित नाही, ते मी भोगलेले आहे. पक्षाच्या कार्यकर्ते आणि जनतेसाठी आम्ही सतत काम करत असतो. सभागृहात उद्या आम्हीच शिवसेनेच्या बाकीच्यांना प्रत्युत्तर द्यायला पुरेसे आहोत, असेही गुलाबराव (Gulabrao Patil) म्हणाले.

किनगावातील मुकुंदा लोहारविरूद्ध खुनाचे दोन गुन्हे दाखल 


कॉपी करू नका.