धुळ्यातील अवैध सावकारी प्रकरण : आरोपी संजय बंब जाळ्यात


धुळे : राज्यभर गाजत असलेल्या धुळ्यातील अवैध सावकारी प्रकरणात मुख्य आरोपी व अवैध सावकार राजेंद्र बंबचा मोठा भाऊ संजय बंब याला मालेगाव शहरातून आर्थिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या बामि. आरोपीला आज गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. कोट्यवधींचे घबाड बंब कुटुंबियांकडून आतापर्यंत जप्त करण्यात आल्याने राज्यात धुळ्यातील अवैध सावकारी प्रकरण चर्चेत आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळ्यातून पसार झाल्यानंतर संजय बंब मालेगावमधील एका लॉजमध्ये लपून असल्याची आर्थिक गुन्हे शाखेला मिळताच बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्याला ताब्यात घेण्यात आले. शासकीय सोपस्कार पूर्ण केल्यानंतर सायंकाळी सुमारे सव्वासात वाजता त्याच्या अटकेची नोंद करण्यात आली. संशयित संजय बंबला आज गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येईल. उपअधीक्षक ईश्वर कातकडे, अधिकारी हेमंत बेंडाळे, उपनिरीक्षक हर्षवर्धन बहीर, कर्मचारी हिरालाल ठाकरे, गयासोद्दीन शेख, भूषण जगताप, रवींद्र शिंपी, मनोज बाविस्कर, राजू गिते यांच्या पथकाने आरोपीला अटक केली.

आघाडी सरकार कोसळले : उद्धव ठाकरेचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा !


कॉपी करू नका.