लोकमान्य टिळक टर्मिनस-मनमाड अतिजलद विशेष ट्रेनला मुदतवाढ
Extension Of Lokmanya Tilak Terminus-Manmad Super Fast Special Train भुसावळ : रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस आणि मनमाड दरम्यान धावणार्या अतिजलद विशेष ट्रेनला मुदतवाढ देण्यात आली आहे. 02101 लोकमान्य टिळक टर्मिनस-मनमाड अतिजलद विशेष ट्रेनला 1 जुलै 2022 ते 30 सप्टेंबर 2022 दरम्यान मुदतवाढ देण्यात आली आहे. 02102 मनमाड-लोकमान्य टिळक टर्मिनस अतिजलद विशेष ट्रेनला 1 जुलै 2022 ते 30 सप्टेंबर 2022 पर्यंत चालवण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. गाडीच्या वेळेसह संरचना आणि थांबा यात कोणताही बदल झालेला नाही. गुरुवारपासून रेल्वेच्या संकेत स्थळावर तिकीट बुकींग सुविधेला सुरूवात झाली आहे.