Soniya Gandhi काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी ईडी कार्यालयात हजर ; काँग्रेसचे देशभर आंदोलन

काँग्रेसचे देशभर आंदोलन : नरेंद्र मोदी सरकारकडून सुडाचे राजकारण होत असल्याचा आरोप


नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Soniya Gandhi) या गुरुवारी चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाल्या आहेत. दरम्यान, ईडीच्या चौकशीच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे देशभरात आंदोलन करण्यात येत असून अनेक पदाधिकार्‍यांना अटकही करण्यात आली आहे. दरम्यान, नरेंद्र मोदी सरकार हे सुडाचे राजकारण करीत असल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकारी करीत आहेत.

ईडीकडून सखोल चौकशी
कोरोनामधून बरे झाल्यानंतरही सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली आहे आणि अशा परिस्थितीत त्यांना औषधांची गरज आहे. ईडीचे सहाय्यक संचालक स्तरावरील अधिकारी सोनिया गांधी यांची चौकशी करीत आहेत. राहुल गांधी, अशोक गेहलोत, आनंद शर्मा यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेतेही कार्यालयात जाऊ शकतात, असे बोलले जात आहे. त्याचबरोबर काँग्रेस कार्यकर्तेही मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत. सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशीच्या निमित्ताने काँग्रेसने ताकद दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी सकाळीच काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने पक्ष कार्यालय गाठून सोनियांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. दरम्यान, सोनिया गांधी यांच्यासोबत पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi)  आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) देखील ईडी कार्यालयात आले असून राहुल आणि प्रियंका यांना एका स्वतंत्र खोलीत बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.



मोदी सरकारचे सुडाचे राजकारण
दरम्यान, नरेंद्र मोदी सरकार सूडाचे राजकारण करत असल्याचा आरोप करीत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आज सकाळी बैठक घेतली. तसेच, या नेत्यांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले आहे. मोदी सरकार सूडबुद्धीने राजकीय नेत्यांना त्रास देत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. काँग्रेसने देशभरातील ईडी कार्यालयांनाही घेराव करण्याचे नियोजन केले आहे. विशेषत: दिल्लीत काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात निरीक्षक के.के.पाटील यांनी पदभार स्वीकारला





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !