Chalisgaon City Police Station Inspector K.K. Patil चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात निरीक्षक के.के.पाटील यांनी पदभार स्वीकारला


Chalisgaon City Police Station Inspector K.K. Patil Assumed Charge चाळीसगाव : चाळीसगाव शहर पोलिस ठाण्याच दोन कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक के. के. पाटील यांची नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आली होती मात्र शिस्तप्रिय अधिकार्‍याच्या बदलीने आश्‍चर्य व्यक्त करण्यात आले होते मात्र पंधरा दिवसानंतर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी पूर्ववत पाटील यांच्याकडे शहर पोलिस ठाण्याची धूरा सोपवली आहे. निरीक्षक पाटील यांनी पदभार स्वीकारताच कर्मचार्‍यांनी त्यांचे स्वागत केले.

अवैध धंदे चालकांच्या गोटात खळबळ
चाळीसगाव येथील पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांची 7 जुलै रोजी पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली होती. पाटील यांनी अतिशय धडाकेबाज कामगिरी करत अवैध धंद्यांना चाप बसविल्याने ते येथून गेल्यामुळे दोन नंबरच्या धंदेवाल्यांनी आनंदोत्सव साजरा केला होता. मात्र पंधरा दिवसात ते पुन्हा एकदा चाळीसगाव पोलीस स्थानकाला पुन्हा रूजू झाल्याने त्यांचे धाबे दणाणले आहे. दरम्यान. पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांचे शहर पोलीस स्थानकाच्या कर्मचार्‍यांनी स्वागत केले.

महिलेचा विनयभंग करीत कुटुंबाला धमकावले : जळगावातील पूजार्‍यासह सहा जणांविरोधात गुन्हा


कॉपी करू नका.