Draupadi Murmu as the President of India भारताच्या राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू


Draupadi Murmu as the President of India नवी दिल्ली : एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत अखेर विजय झाला आहे. देशात पहिल्यांदाच एक आदिवासी महिला राष्ट्रपतीपदावर विराजमान झाली असून आज दिवसभर देशातील विविध भागात मुर्मू यांची निवड होणार हे गृहित धरून जल्लोष सुरू होता. मुर्मू यांनी विरोधकांचे उमेदवार असलेल्या यशवंत सिन्हा (धरीहुरपीं डळपहर) यांचा पराभव केला आहे. द्रौपदी मुर्मू यांना 812 मतं तर यशवंत सिन्हा यांना 521 मतं मिळाली आहेत. द्रौपदी मुर्मू 24 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतील. देशाचे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपुष्टात येत आहे.

शिंदे सरकारची मोठी घोषणा : यंदाच्या गणेशोत्सवासह दहिहंडीवर कुठलेही निर्बंध नाहीच

आदिवासी समाजाचा सन्मान
एनडीएनं राष्ट्रपतीपदासाठी आदिवासी महिलेचा चेहरा देत धक्कातंत्र आजमावलं होतं. देशातील आदिवासी समाजाचा सन्मान म्हणून विरोधकांमधील काही पक्षांनीही मुर्मू यांच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला होता. मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यातच मुर्मू यांनी आघाडी घेतली होती ती अखेरच्या म्हणजेच तिसर्‍या टप्प्यापर्यंत कायम राखली. पहिल्या टप्प्यात मुर्मू यांना 540 मतं मिळाली होती. या मताचे मूल्य 3,78,000 इतकं होतं. तर विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना 208 मतं मिळाली होती. त्यांच्या मतांचं मूल्य 1,45,000 इतकं होतं. दुसर्‍या फेरीत मुर्मू यांना 1349 मतं मिळाली तर यशवंत सिन्हा यांना 537 मतं मिळाली. तिसर्‍या फेरीत विजयावर शिक्कामोर्तब करत मुर्मू यांची विजयाची आघाडी एकूण 812 मतांपर्यंत पोहोचली. तर यशवंत सिन्हा यांना 521 मतं पडली. तिन्ही फेरीत एकूण मिळून द्रौपदी मुर्मू यांना 2161 मतं मिळाली तर यशवंत सिन्हा यांना 1058 मतं मिळाली.

द्रौपदी मुर्मू यांचा राष्ट्रपतीपदावर विजय निश्‍चित : देशभरात जल्लोष


कॉपी करू नका.