Draupadi Murmu’s victory in the presidency is assured: nationwide jubilation द्रौपदी मुर्मू यांचा राष्ट्रपतीपदावर विजय निश्‍चित : देशभरात जल्लोष


Draupadi Murmu’s victory in the presidency is assured: nationwide jubilation नवी दिल्ली : देशवासीयांचे लक्ष लागून असलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्‍चित मानला जात आहे. आदिवासी समाजाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती ठरणार असून देशभरातील विविध भागातील आदिवासी बांधवांनी आतापासून निवडीचा सर्वत्र जल्लोष सुरू केल्याचे चित्र आहे.

99 टक्के लोकप्रतिनिधींनी बजावला हक्क
देशाचे 15 वे राष्ट्रपती निवडण्यासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीमध्ये 99 टक्के लोकप्रतिनिधींनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून देशातील 10 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात 100 टक्के मतदान पार पडले. राष्ट्रपती पदासाठी 771 खासदार आणि 4025 आमदारांसह 4796 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. त्यामुळे आज या निवडणुकीचा निकाल लागणार असून याकडे सगळ्या देशाचे लक्ष लागले आहे. भाजपकडून राष्ट्रपतिपदासाठी द्रौपदी मुर्मू तर विरोधी पक्षांनी यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुर्मू विजयी झाल्यास त्या देशाच्या दुसर्‍या महिला राष्ट्रपती असतील. तसंच त्या पहिल्या आदिवासी समाजाच्या नेत्या म्हणून 25 तारखेला देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होतील.

पुण्याला बहिणीच्या साखरपुड्यास निघालेल्या राजस्थानच्या तरुणीचा रेल्वे प्रवासात मृत्यू

रालोआकडून द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी
भाजपच्या नेतृत्त्वातील रालोआनं द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu’s) यांना उमेदवारी दिली आहे. रालोआमधील घटक पक्षांशिवाय बीजेडी, वायएस काँग्रेस, बीएसपी,अण्णाद्रमुक, देलगू देसम पार्टी, जनता दल संयुक्त, शिरोमणी अकाली दल, शिवसेना, झारखंड मुक्ती मोर्चानं मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. या पक्षांचा पाठिंबा मिळाल्यानं मुर्मू यांना सिन्हा यांच्याविरुद्ध आघाडी मिळताना दिसत आहे. द्रौपदी मुर्मू या निवडणुकीत विजयी झाल्यास पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती ठरतील. दरम्यान, विरोधी पक्षांनी संयुक्तपणे यशवंत सिन्हा यांना उमेदवारी दिली आहे. तृणमूल काँग्रेस, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, द्रमुक, राजद, टीआरएस, डावे पक्ष, आप यांच्यासह इतर विरोधी पक्षांनी यशवंत सिन्हा यांना पाठिंबा दिला आहे. नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी 25 जुलै रोजी होईल.

शिंदे सरकारची मोठी घोषणा : यंदाच्या गणेशोत्सवासह दहिहंडीवर कुठलेही निर्बंध नाहीच


कॉपी करू नका.