नंदुरबारातील सहायक लेखापालासह तंत्रज्ञास लाचखोरीचा शॉक
नंदुरबार : इलेक्ट्रिक वीज मीटर फॉल्टी असल्याचे सांगत गत 10 महिन्यांचे एक लाख 25 हजार रुपये इतके बिल भरावे लागेल, असे सांगून बिल कमी करण्यासाठी 20 हजारांची मागणी केल्यानंतर तडजोडीअंती 18 हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी नंदुरबारचे तंत्रज्ञ (वायरमन) धनंजय भिका कानडे याने व सहायक लेखापाल जितेंद्र गुलाब ठाकूर (38) यांना अटक करण्यात आली. आरोपींनी 30 नोव्हेंबर रोजी लाचेची मागणी केल्यानंतर प्रत्यक्षात बुधवारी लाच स्वीकारली. नंदुरबार एसीबीचे उपअधीक्षक शिरीष जाधव, पोलिस निरीक्षक जयपाल अहिरराव, हवालदार उत्तम महाजन आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
