Former Chairman Of Tata Sons And Veteran Businessman Cyrus Mistry Killed In Road Accident टाटा सन्सचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ उद्योगपती सायरस मिस्त्री रस्ते अपघातात ठार


Former Chairman Of Tata Sons And Veteran Businessman Cyrus Mistry Killed In Road Accident मुंबई : रस्ते अपघातात टाटा सन्सचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे रविवारी पालघरजवळ निधन झाले. अपघातानंतर त्यांना रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मुंबई-अहामदाबाद महामार्गावर हा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की मिस्त्री यांच्या कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.

मर्सिडी दुभाजकावर आदळली
अहमदाबाद शहरातील काम आटोपून मिस्त्री हे मुंबईला आपल्या मर्सिडी वाहनातून येत असताना रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास हा अपघात झाल्याचे पालघर पोलिसांनी सांगितले. मर्सिडीज कार दुभाजकावर जोरदार आदळल्याने मस्त्री यांच्यासह त्यांच्या चालकाचा मृत्यू झाला आहे. पालघर जिल्हा पोलिस अधिक्षकांनी या वृत्तास दुजोरा दिला.

सायरस मिस्त्री कोण होते ?

सायरस मिस्त्री हे प्रसिद्ध उद्योगपती पालोनजी शापूरजी यांचे धाकटे पुत्र होते. 2019 मध्ये, सायरस मिस्त्री यांनी टाचा ग्रुपचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. मिस्त्री यांचा जन्म मुंबईतील पारशी कुटुंबात झाला. पल्लोनजी मिस्त्री यांचे ते धाकटे पुत्र होते. त्यांनी लंडन बिझनेस स्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि इम्पीरियल कॉलेज, लंडनमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले होते.

2006 मध्ये मिस्त्री टाटा समूहाचे सदस्य झाले. 2013 मध्ये ते वयाच्या अवघ्या 43 व्या वर्षी टाटा समूहाचे चेअरमन झाले. मात्र, 2016 साली झालेल्या वादानंतर मिस्त्रींना टाटाच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आले होते. मिस्त्री यांच्यावर तोट्यात चाललेल्या विदेशी कंपन्यांमधील स्टेक विकल्याचा आरोप होता. टाटा समूहातील वाद न्यायालयात पोहोचला होता. मिस्त्री यांनी शापूरजी पालोनजी समूहाचे व्यवस्थापकीय संचालकपदही भूषवले होते. मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील मृतांना आणि जखमींना टाटा समूहाकडून मदत करण्यात सायरस यांचा मोलाचा वाटा होता.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !