A Minor Girl Was Molested in Bodwad City बोदवड शहरातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग
A Minor Girl Was Molested in Bodwad City बोदवड : दहा वर्षीय अल्पवयीन मुलीला अण्णाभाऊ साठे आर्थिक महामंडळाकडून आर्थिक लाभ मिळावा म्हणून तेथील प्रकरण करून देतो, असे खोटे आमिष दाखवून रविवारी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास जुना सोनोटी ते बोदवड रोडवरील असलेल्या प्लॉटवर नेत तिच्याशी अश्लील कृत्य करण्यात आले. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.
बोदवड पोलिसात गुन्हा दाखल
या प्रकरणी आरोपी बाळू उर्फ नेनू धना सोयसे (मनुर बु.॥, ता.बोदवड) याच्याविरोधात बोदवड पोलिसात पोस्को कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अंकुश जाधव करीत आहेत.

