तळोदा पंचायत समितीचा लाचखोर लिपिक एसीबीच्या जाळ्यात


पाचशे रुपयांची लाच भोवली : नंदुरबार एसीबीचा सापळा यशस्वी

तळोदा : प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल बांधकाम अनुदान योजनेचा 15 हजारांचा पहिला हप्ता बँक खात्यात वळता करण्यासाठी 500 रुपयांच्या लाचेची मागणी करणार्‍या तळोदा पंचायत समितीतील लिपिक अंकुश फकिरा चित्ते (31) यास सोमवारी सायंकाळी पंचायत समिती कार्यालयाजवळच लाच घेताना नंदुरबार एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. या कारवाईने पंचायत समितीच्या वर्तुळातील लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. ही कारवाई नंदुरबार एसीबीचे उपअधीक्षक शिरीष जाधव यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक जयपाल अहिररराव, हवालदार महाजन गुमाणे, चित्ते, नावडेकर, ज्योती पाटील, चालक बोरसे आदींच्या पथकाने केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !