मरीमाता यात्रोत्सवानिमित्त फैजपूरला उद्या बारागाड्या


फैजपूर : फैजपूर शहरातील दक्षिण बाहेरपेठ भागातील पुरातन काळातील मरीमातेचे जागृत देवस्थानाच्या यात्रोत्सवानिमित्त मंगळवार, 13 रोजी सायंकाळी सहा वाजता परंपरागत पद्धतीने बारागाड्या भगत संजय सेवकराम कोल्हे हे ओढणार आहेत. बारागाड्या ओढण्यासाठी असंख्य भक्तगणांची साथ लाभणार असून अंकलेश्वर-बर्‍हाणपूर मार्गावरील म्युनीसीपल हायस्कूल ते सुभाष चौकापर्यंत बारागाड्या ओढण्यात येतील. दरमयान, मरीमातेचा परीसरात सभामंडप उभारण्यात येणार असल्याचे प्रभाकर सपकाळे म्हणाले.


कॉपी करू नका.