चोरवड तपासणी नाक्यावर आरटीओ अधिकार्‍यासह लिपिकास धक्काबुक्की : तिघांना अटक


रावेर : तालुक्यातील चोरवड तपासणी नाक्यावर मद्य प्राशन करून आरटीओ अधिकार्‍यास मला नोकरीवर लावा म्हणून येथील मोटर वाहन निरीक्षकाला धक्काबुक्की करीत शासकीय कामात अडथळा निर्माण करणार्‍या दोघांविरुद्ध रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघे आरोपींना अटक करण्यात आली. चोरवड येथील संशयीत आरोपी किरण पाटील (27) योगेश रजाने (34) हे 19 रोजी चोरवड (ता.रावेर) येथील आरटीओ चेक पोस्टवर आल्यानंतर त्यांनी ड्युटीवरील मोटार वाहन निरीक्षक नितीन भीकनराव अहिरे यांना शिवीगाळ तुम्ही कसे येथे ड्युटी करता, पाहूनच घेतो असे म्हणत अहिरे यांना धक्काबुक्की केली व सरकारी कामात अडथळा निर्माण करीत शांतता भंग केली. या प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना तत्काळ अटक करण्यात आली. घटनास्थळी पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, तपास अधिकारी सहाय्यक निरीक्षक शीतलकुमार नाईक यांनी भेट दिली.

कनिष्ठ लिपिकास केली मारहाण
कनिष्ठ लिपिक बापूराव कापले यांनादेखील संशयीत आरोपी मनीष गोसावी याने दारूच्या नशेत तुझ्या साहेबाने माझ्या मित्रांविरुद्ध पोलिसात तक्रार दिली म्हणून येथील सीमा तपासणी नाका बंद करा म्हणत धिंगाना घातला व येथील आरटीओ कार्यालयात घुसून खुर्ची फेकत शिवीगाळ केली व धमकी देऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून गोसावीविरुद्धदेखील गुन्हा दाखल करण्यात आला. तिघांना रात्री उशिरा रावेर पोलिसांनी अटक केली.


कॉपी करू नका.