नाताळासाठी नागपूर-सोलापूर विशेष गाडी धावणार

भुसावळ- नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे गाड्यांना असलेली गर्दी लक्षात घेता प्रवाशांची जागेसाठी गैरसोय टाळण्यासाठी सोलापूर-नागपूर दरम्यान विशेष गाडी चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. सोलापूर -नागपूर या मार्गावर चार फेर्या विशेष रेल्वे गाडीच्या चालविल्या जाणार आहे. नाताळाच्या पार्श्वभुमीवर रेल्वे प्रशासनाकडून सोलापूर-नागपूर विशेष गाडी सुरू करण्यात आली. 02111 डाऊन सोलापूर-नागपूर ही गाडी 22 डिसेंबरला सोलापूर येथून रात्री आठ वाजता सुटणार आहे. दुसर्या दिवशी ही गाडी दुपारी 1.30 वाजता नागपूरला पोचेलतर अप मार्गावरील 02112 नागपूर सोलापूर ही गाडी 23 डिसेंबरला सोमवार, 23 रोजी दुपारी तीन वाजता नागपूर येथून सुटणार आहे. ही गाडी मंगळवारी सकाळी 8.40 वाजता सोलापूरला पोचणार आहे. ही गाडी कुर्डूवाडी, दौड, नगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव, वर्धा येथे थांबणार आहे. तर दुसरी विशेष गाडी (02113) डाऊन सोलापूर – नागपूर ही 26 डिसेंबरला दुपारी एकला सुटणार असून दुसर्या दिवशी सकाळी 5.15 वाजता ही गाडी नागपूरला पोचेल. या गाडीच्या तीन फेर्या होणार आहे. तर अप (02114) अप नागपूर सोलापूर विशेष गाडी शुक्रवार, 27 रोजी रात्री 7.40 वाजता सुटणार आहे. दुसर्या दिवशी दुपारी 1.10 वाजता ही गाडी सोलापूरला पोचेल. ही गाडी कुर्डूवाडी, दौड, नगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव, वर्धा येथे थांबणार आहे. या गाड्यांचे आरक्षण विशेष शुल्क आकारातून 21 डिसेंबरपासून सुरू केले जाणार आहे. प्रवाशांनी या गाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


