स्टेट बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये गीतेश बारी प्रथम


यावल : शहरातील रुद्रा बॉक्सिंग क्लबचा विद्यार्थी गितेश बारी याने महाराष्ट्र स्टेट बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याने मिळवलेल्या यशाबद्दल एका छोटेखानी कार्यक्रमांमध्ये हे त्याचा गौरव करण्यात आला शहरात सध्या रुद्रा बॉक्सिंग क्लबच्या माध्यमातून अनेकांना बॉक्सिंगचे धडे दिले जात आहेत. यावल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात रुद्रा बॉक्सिंग क्लबतील खेळाडू गितेश बारी याचा गौरव करण्यात आला. त्याने नुकतेच महाराष्ट्र स्टेट बॉक्सिंग चॅम्पियनशीप 2019 मध्ये प्रथम क्रमांक पटकावला. अकोला येथे ही स्पर्धा पार पडली. यावेळी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील, महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.एफ.एन.महाजन, किरण तडवींसह मान्यवरांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन सकावत तडवी यांनी केले.


कॉपी करू नका.