बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये चित्रकला व विज्ञान प्रदर्शन उत्साहात


भुसावळ : बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये पालक दिवसाचे औचित्य साधून चित्रकला प्रदर्शन भरविण्यात आले. यात शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध कला कौशल्य सादर करीत वैज्ञानिक मॉडेल, चार्ट तसेच सामाजिक बांधिलकी जोपासणार्‍या विषयावरचे चित्र जसे- मुली वाचवा, मुली शिकवा, पाणी वाचवा व वृक्ष संवर्धन आदींचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. या प्रदर्शनाचे उद्घाटन पालकांमधून मलखान सिंग यांनी फित कापून केले. यावेळी संस्थाध्यक्ष मनोज बियाणी व सचिव संगीता बियाणी, प्राचार्य डी.एम.पाटील उपस्थित होते. सर्व विद्यार्थी व पालकांनी चित्र प्रदर्शनाचा आनंद घेतला. ज्या विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक मॉडेल बनविले होते. त्यांनी त्याबद्दल माहिती दिली.

विज्ञानात करावी प्रगती -संगीता बियाणी
संगीता बियाणी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी आपल्यातील चांगले शैक्षणीक गुण दाखवून विज्ञानात चांगली प्रगती करावी, तुमच्यातून सुद्धा चांगला वैज्ञानिक घडू शकतो. सूत्रसंचालन एस.आर.पाटील यांनी केले. जे.आर.सोनार यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी परीश्नम घेतले.


कॉपी करू नका.